लोहगाव मध्ये छठ पूजा कार्यक्रम उत्साहात
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
अखंड विहार छठ पूजा समिती, लोहगाव यांच्या तर्फे सार्वजनिक भव्य छठ पूजा महोत्सव तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत नगर येथील जोगेश्वरी मिसळ हॉटेल समोर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान, लोहगाव येथील हरणतळे याठिकाणी देखील छठ पूजा सेवा ट्रस्ट च्या वतीने छठ पूजा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सूर्यास्त आणि सूर्योदया पूर्वी पूजा करण्यासाठी उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर उत्तर भारतीय बांधवांना छठ पूजेच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय मंडळींनी गर्दी केली होती.

हरणतळे येथील कार्यक्रमाचे आयोजन छठ पूजा सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष निरज राव, उपाध्यक्ष मृत्युंजय कुमार, अशोक झा, संतोष कुमार यासह सेवा समितीच्या सदस्यांनी केले होते. संत नगर येथील जोगेश्वरी मिसळ हॉटेल समोर अखंड विहार छठ पूजा महोत्सवाचे आयोजन नितेश कुंवर, संजीव चौधरी, राजेश कुमार, रामनारायण यादव, सुनील यादव, हृदय कुमार, शिवम राय, वीरेंद्र कुमार, रवींद्र मिश्रा, विनय सिंह, एस बी सिंह, ए एन सिंह, यासह अखंड विहार छठ पूजा समिति सदस्यांनी केले होते.
ओळ: लोहगाव येथे विविध ठिकाणी छठ पूजा उत्साहात साजरी करण्यात आली.


















