स्वरा कोथिंबीरे तायकांदो क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालय लोहगाव ची विद्यार्थिनी स्वरा संतोष कोथिंबीरे हिची नुकत्याच संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायकांदो क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून तिची पंजाब लुधियाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे या विद्यार्थिनीला वेळोवेळी शाळेचे मुख्याध्यापक क्रीडाशिक्षक व तायकांडो प्रशिक्षक बारामती तायक्वांदो अकॅडमीचे व बारामती कला क्रीडा फाउंडेशनचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले तिचे मार्गदर्शक मास्टर दीपक मोरे विशाल शेडगे विशाल माने यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करीत स्वराने मनपा महानगरपालिकेला तसेच विभाग स्थर आता राज्यस्तर येथे उत्तम कामगिरी करून तिची लुधियाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, मानद सचिव संदीप कदम, मुख्याध्यापक शिक्षक वर्ग यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो: स्वरा कोथिंबीरे

















