निंबाळकर नगर मधील धोकादायक विद्युत तारा भूमिगत होणार
अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांचा पुढाकार
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक एक कळस-धानोरी-लोहगाव मधील निंबाळकर नगर याठिकाणी विद्युत तारा भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्या प्रयत्नातून या भागातील धोकादायक असणाऱ्या विद्युत तारा भूमिगत होणार असल्याने रहिवाशांनी बॉबी टिंगरे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी निंबाळकर नगर मधील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब फोंडे, उपाध्यक्ष संजय टकले, खजिनदार बबन चौगुले, सचिव मारुती ससे, रहिवाशी सौ पूनम पोळ, श्री संतोष निंबाळकर, सौ शीला लीगाडे यासह स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी युवा नेते विशाल टिंगरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.
फोटो: प्रभाग क्रमांक एक मधील निंबाळकर नगर याठिकाणी विद्युत तारा भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ करताना माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे व स्थानिक रहिवाशी.















