• Home
  • क्राईम
  • भंगार च्या दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या तिघांना डांबून ठेवून बेदम मारहाण ; एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर
Image

भंगार च्या दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या तिघांना डांबून ठेवून बेदम मारहाण ; एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर

भंगार च्या दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या तिघांना डांबून ठेवून बेदम मारहाण ; एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर

वडगावशेरी: प्रतिनिधी
भंगाराच्या दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्यातिघा चोरट्यांना लोखंडी पाईप ने बेदम मारहाण केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नवाज इम्तियाज खान (वय २६, रा. रिजवानी मस्जिद समोर, भवानी पेठ, पुणे) याचा मृत्यू झाला. तर हमीद अफजल अहमद (वय१९), आश्रम मेहबूब शेख (वय २६, दोघेही रा. भवानी पेठ पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार वडगावशेरीतील सोपान नगर येथे आज (सोमवार दिनांक १३) रोजी पहाटे घडला.

मारहाण करणाऱ्या अहमद मोहम्मद पुरियाल (वय 46 वर्ष रा. साईनाथ सोसायटी खान मंजिल सोमनाथ नगर वडगाव शेरी), मुकेश भगेदी चौरसिया (वय 24 वर्षे, रा. मोहम्मद स्क्रॅप सेंटर एपीके ट्रेडर्स पंतनगर, सोपान नगर रोड वडगाव शेरी), धर्मेश जगराम चौधरी (वय 18 वर्ष, रा. सदर), दिलीप कुमार सोमय्या प्रसाद (वय 32 वर्षे, रा. सदर ), गणेश रामलोचन गौतम (वय २०, रा.सदर), सुरज रामकिसन सोनी (वय ३३ वर्ष रा. सदर), महेश जग्गू कुमार (वय १९ वर्ष रा. सदर), सुनील रामसेवक कुमार (वय २४, रा.सदर), घनश्याम लक्ष्मण चौधरी (वय 46, रा.सदर), जितेंद्र रामलोचन कुमार (वय 25, रा.सदर) व अन्य एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा गुन्ह्यात समावेश आहे.
मयत व जखमी हे हे वडगावशेरीतील सोपान नगर याठिकाणी एपीके ट्रेडर्स या भंगार दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने पहाटे तीन च्या दरम्यान गेले होते. यावेळी १० आरोपींनी या तिघांना पकडून लोखंडी, स्टील, पीव्हीसी पाईप याने बेदम मारहाण केली. गोडाऊन मध्ये डांबून ठेवले. दुकान मालक अहमद मोहम्मद पुरीयाल यांनी येऊन पुन्हा या तिघांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये नवाज खान याचा मृत्यू झाला. तर अमित अहमद आश्रम शेख एक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल झाला असून 11 आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली. अधिक तपास चंदन नगर पोलीस करत आहेत.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top