• Home
  • सोशल
  • पुणे ते शिरूर उड्डाण पूल उभारणी साठी निविदा
Image

पुणे ते शिरूर उड्डाण पूल उभारणी साठी निविदा

पुणे ते शिरूर उड्डाण पूल उभारणी साठी निविदा

लोहगाव: टाईम्स प्रतिनिधी
अहिल्या नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे ते शिरूर दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (एमएसआयडीसी) काढलेल्या निविदा पूर्वगणन पत्रकापेक्षा (इस्टिमेट) सुमारे ४६ टक्के जादा दराने आल्या आहेत. यापूर्वीच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने महामंडळाने आता पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉरसाठीच्या कामाचाही यात समावेश केला. हे काम साडेचार हजार कोटी रुपयांचे असून यासाठी तीन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्या अधिक दराच्या असल्याने त्याला मान्यता मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य सरकारने पुणे ते शिरूर दरम्यान ५४ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय), राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्या ऐवजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महामंडळाकडून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुविधा महामंडळाने या उड्डाणपुलाच्या कामाबरोबरच पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन साडेचार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित (इस्टिमेट) धरून या निविदा काढण्यात आल्या. त्याला तीन कंपन्यांनी प्रतिसाद देत निविदा दाखल केल्या होत्या. त्या निविदा महामंडळाकडून उघडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वेलस्पून एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीने ८ हजार ७४५, तर अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीने १० हजार १२४ आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या कंपनी १० हजार ३३५ रुपयांची निविदा भरली आहे. सुविधा महामंडळाने केलेल्या इस्टिमेट रकमेपेक्षा ४५.९५ टक्के जादा दराने निविदा आल्या आहेत. त्यावर सुविधा महामंडळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Releated Posts

उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद

उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद लोहगाव टाईम्स : प्रतिनिधीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनामुळे लोहगाव मधील मेडिकल वगळता…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 31, 2026

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी राजारामबापू महाविद्यालयामध्ये लोकनेते राजारामबापू…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 17, 2026

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अ‍ॅट अ टाइम” वाचन शिबिर

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अ‍ॅट अ टाइम” वाचन शिबिर लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 17, 2026

पुण्यात श्रील गुरुदेवांच्या जन्मशताब्दीचा जगभरातील सोहळा संपन्न

पुण्यात श्रील गुरुदेवांच्या जन्मशताब्दीचा जगभरातील सोहळा संपन्न लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी श्री चैतन्य गौडीय तीर्थ सेवाश्रम, श्री रामधन पार्क,…

ByBylohegaontimeseditor@gmail.com डिसेंबर 27, 2025
Scroll to Top