• Home
  • क्राईम
  • चंदननगर, येरवडा परिसरात गुन्हे शाखेकडून छापेमारीत १७ लाखांचा गुटखा, गांजा जप्त
Image

चंदननगर, येरवडा परिसरात गुन्हे शाखेकडून छापेमारीत १७ लाखांचा गुटखा, गांजा जप्त

चंदननगर, येरवडा परिसरात गुन्हे शाखेकडून छापेमारीत १७ लाखांचा गुटखा, गांजा जप्त

लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी

चंदननगर आणि येरवडा परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवशी केलेल्या दोन स्वतंत्र कारवाईत तब्बल १७ लाख ८ हजार रुपये किंमतीचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा असा अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली, तर दोघे आरोपी फरार आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने वडगावशेरीतील पिनाक सोसायटीत छापा टाकून आरोपी श्रवण हनुमाराम गेहलोत (३५), लाबुराम पकाराम देवासी (२५), दिनेशकुमार आचलाराम प्रजापती (४०) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा गुटखा व पानमसाला असा माल जप्त केला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर

सैनिकवाडी, वडगावशेरी येथील सार्वजनिक रस्त्यावर गुटखा विक्री करणाऱ्या विजय काशीद (२२) याला पकडून त्याच्या ताब्यातून २ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, नगर रोडवरील भोला पान शॉप येथे छापा टाकून सुभाषचंद्र रामअवध मोर्या (३४, रा. येरवडा) याच्या ताब्यातून १० लाख ११ हजार रुपये किंमतीचा गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, अजिम शेख, साहिल शेख, आझाद पाटील, मयूर सूर्यवंशी, रवींद्र रोकडे, चेतन गायकवाड, बबनराव केदार, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड, मच्छिद्र धापसे, उदय राक्षे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

फोटो: गुन्हे शाखेकडून छापेमारीत जप्त करण्यात आलेला गुटखा व आरोपी.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top