रेखाताई टिंगरे यांनी स्वखर्चातून खंडोबा माळ रस्ता केला दुरुस्त; रहिवाशांनी मानले आभार
वडगावशेरी : प्रतिनिधी
लोहगाव मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते खंडोबा माळ येथील रस्ता काही वर्षा पासून खराब झाला होता. खंडोबा माळ परिसरात रहाणाऱ्या नागरिकांना यामुळे रहदारी करणे अडचणीचे होते. त्यामुळे रहिवाशांनी याबाबत माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांच्याशी संपर्क साधला. टिंगरे दांपत्यानी स्वतः खंडोबा माळ रोड येथे प्रतक्षा भेट दिली व सर्व नागरिकां समवेत खंडोबा माळ रोड ची पहाणी केली व रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. टिंगरे दापत्यांनी
स्वतःच्या खर्चाने पूर्ण खंडोबा माळ रोड वर मुरुम टाकुन दिला आहे. खड्डे बुजवून रस्ता समतल करून दिला आहे. यामुळे सर्व खंडोबा माळ मधील रहिवाशांनी माजी नगरसेविका सौ रेखाताई टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांचे खंडोबा माळ नागरिक तर्फे आभार मानून येणाऱ्या महापालिका निवडणुकी साठी संपूर्ण पाठींबा दर्शविला. यावेळी समाज सेवक श्रीकांत वाळंज, केशवराव राखपसरे, सुनिल ठोके, बजरंग शिंदे, विजय पवार, बजरंग सोनवणे, मनोज पांनके, पप्पु ठाकुर, श्री एरुनकर यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रेखा टिंगरे म्हणाल्या, माझे माहेर लोहगाव आहे. हा परिसर माझ्या प्रभागात आल्याने जसा धनोरीचा विकास झाला तसा विकास उर्वरित लोहगा
फोटो: लोहगाव मधील खंडोबा माळ येथील रस्त्यावर रेखाताई टिंगरे यांनी मुरुम टाकून दिला.















