• Home
  • क्राईम
  • उबाळेनगमध्ये विजेचा स्पर्श लागून मृत्यू
Image

उबाळेनगमध्ये विजेचा स्पर्श लागून मृत्यू

लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
कोजागरी पौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या देवीच्या मिरवणुकीतील देखाव्यातील काही भागाचा विद्युत तारेला स्पर्श झाला आणि या दुर्घटनेत एका मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली भागातील उबाळेनगमध्ये घडली. या प्रकरणी एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नितीन मोहन पवार (२३, रा. उबाळेनगर, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वसुंधर शिवदास उबाळे, संदीप छगनराव वहाडणे (रा. रेणुका पार्क, वाघोली), संजीव श्रीपती जगदाळे (रा. उबाळेनगर), सचिन राजू नलावडे (रा. गोरे वस्ती, वाघोली) संकेत शिवाजी राउत (रा. शिरवली बुद्रुक, जुन्नर), मयूर मच्छिंद्र थोरात (रा. मांजरवाडी, जुन्नर) मेहुल अविनाश नवले (रा. कुरंद, जुन्नर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कर्मचारी अमोल काळे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उबाळे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने १७ फूट उंच आणि १४ फूट रुंद देखावा, ट्रॅक्टर ट्रॉलीवर केला होता. ट्रॅक्टर ट्रॉलीवर साऊंड सिस्टीम लावली होती. मिरवणूक सुरू असताना रेणुका पार्क रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉलीवर साकारलेल्या देखाव्यातील काही भागाचा विद्युत तारेला स्पर्श झाला. मंडळाचा कार्यकर्ता नितीन पवार याला विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघडकीस आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top