• Home
  • राजकीय
  • वडगावशेरी मतदार संघातील पाणी टंचाई बाबत आमदारांचे आज महापालिकेसमोर आंदोलन
Image

वडगावशेरी मतदार संघातील पाणी टंचाई बाबत आमदारांचे आज महापालिकेसमोर आंदोलन

वडगावशेरी: प्रतिनिधी

वडगावशेरी मतदारसंघातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. अत्यल्प कालावधीसाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विशेषतः महिला वर्गाला प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा थेट आरोप आमदार बापूसाहेब पठारे यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाविरोधात आज मंगळवार (७ ऑक्टोबर) रोजी महापालिके समोर धडक मोर्चा आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आमदार बापुसाहेब पठारे यांनी दिली.

आमदार बापुसाहेब पठारे हे उद्या मंगळवारी महापालिकेसमोर आंदोलन करणार आहेत. काय मागण्या त्यांच्या असणार आहेत यासाठी पहा व्हिडीओ.

आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, की “पुणे महानगरपालिका आयुक्त, मुख्य अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तसेच प्रत्यक्ष पाठपुरावा करूनही अद्यापही कोणतीही ठोस सुधारणा किंवा उपाययोजना राबवण्यात आलेली नाही. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ मार्च रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्षांच्या सूचनेनंतरसुद्धा महानगरपालिका प्रशासनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, नागरिकांच्या पाणीटंचाईचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे.

धानोरी, लोहगाव, विमाननगर, खराडी व वडगावशेरी या भागांमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे अतिशय संथ गतीने सुरू असून ती तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला दररोज किमान अडीच तास पाणी मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका पठारे यांनी मांडली आहे.

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top