• Home
  • क्राईम
  • पोलिसांच्या रेकॉर्डवरील तरुणाचा मध्यरात्री वाघोलीत खून ; प्यासा बार समोरील घटना
Image

पोलिसांच्या रेकॉर्डवरील तरुणाचा मध्यरात्री वाघोलीत खून ; प्यासा बार समोरील घटना

खून करून हल्लेखोर पसार ; वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाघोली : पुणे-नगर महामार्गालगत वाघोलीतील उबाळे नगर परिसरात असणाऱ्या प्यासा बार समोर वादिवाद झाल्यानंतर पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका तरुणाचा निर्घृण खून रविवारी (दि.५) मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास करण्यात आला. त्याच्याच तीन साथीदारांनी धारधार शस्त्राने वार करून तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याने वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करून फरार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

बादल अन्वर शेख (वय २४, रा. आपलेघर सोसायटी, खराडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी अक्षय पटेल (रा. आपलेघर) , मयूर वडमारे (रा. खुळेवाडी), प्रदीप जाधव (रा. आपलेघर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राम अशोक गजमल (रा. खांदवेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा खराडी परिसरात बादल शेख आणि त्याचे तीन साथीदार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर हे चौघेही वाघोलीतील उबाळे नगर परिसरात आले. कृष्णा लॉज येथे रूम घेण्याबाबत चौकशी करत असताना पुन्हा त्यांच्यात वाद वाढला. याच दरम्यान बादल शेखवर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर वार करून त्यानंतर डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या केली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यात बादल शेखचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत वाघोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. खुनामागील नेमके कारण समजण्यासाठी तपास सुरू आहे.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top