लोहगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध- आमदार पठारे
सिताई पार्क येथील वीज रोहित्राच्या कामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
लोहगाव : टाईम्स प्रतिनिधी
लोहगाव परिसरातील रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज ही मुलभूत कामे काही प्रस्तावित आहेत तर अजून खूप काही कामे करावयाची आहेत. लोहगावच्या सर्वांगीन विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे मत वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले. ते सिताई पार्क येथील नविन वीज रोहित्र उभारणी कामाच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.
आमदार पठारे यांच्या प्रयत्नातून ९३ लाखांचे भूमिगत एचटी-एलटी व वीज रोहित्राच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी चंद्रकांत टिंगरे, राजेंद्र खांदवे, संदिप मोझे, शशिकांत मोझे, सोमनाथ खांदवे, एकनाथ खांदवे, लोहगाव महावितरणचे शाखा अभियंता विशाल मोरे, अशोक भुजबळ, सिताई पार्क सोसायटीचे अशोक काकडे, गणेश घोडके, चंचल खंडागळे, किरण पन्हाळकर, प्रकाश काटे, प्रविण तरटे, सुमित कळमकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
आमदार पठारे म्हणाले लोहगाव परिसरात एक पाण्याची टाकी बांधून तयार आहे दुसरीचे काम सुरू आहे. खंडोबामाळ परिसरात वनविभागाच्या जागेत बांधल्या जाणाऱ्या टाक्यांच्या परवानगीचे काम अंतीम टप्प्यात आहे. एकूण आठ टाक्याचे बांधकाम होणार असून चार चाक्यांचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे, लोहगावकरांना दररोज किमान अडीच ते तीन तास योग्य दाबाने पाणी पुरवठा व्हावा या दृष्टीने काम सुरू आहे. तसेच लोहगावातील प्रमुख रस्ते जसे वाघोली धानोरी रस्ता, डी वाय पाटील रस्ता, बस स्थानक वडगाव शिंदे रस्ता, निरगुडी रस्ता ही कामें लवकरच सुरू होत आहेत. अंतर्गत भागात आधी स्ट्रीट लाईटची कामें हाती घेऊन नंतर रस्ते विकसित करण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांना आश्वस्त केले.


















