• Home
  • क्राईम
  • डंपरने महिलेला चिरडले ; वाघेश्वर मंदिर चौकातील घटना
Image

डंपरने महिलेला चिरडले ; वाघेश्वर मंदिर चौकातील घटना

डंपरने महिलेला चिरडले ; वाघेश्वर मंदिर चौकातील घटना

वडगावशेरी : प्रतिनिधी
डंपरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौकात रविवारी (दि. २८) सकाळी आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती प्रकाश देठे (वय ४५, रा. विश्रांतवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, भारती या दुचाकीवरून जात होत्या. वाघेश्वर मंदिर चौकात डंपर भावडी रोड कडे वळत होता. त्यांच्या दुचाकीला डंपर चा धक्का लागला. त्यामुळे दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपर च्या चाकाखाली आल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीच्या नंबर वरून त्यांची माहिती काढून नातेवाईकांना कळविण्यात आले. या प्रकरणी डंपर चालक हिंमत जालिंदर कारके (वय ४२, रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी दत्तात्रेय गोरे यांनी फिर्याद दिली.
चौकट

श्रद्धांजली अर्पण; प्रशासन, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध

अपघातात मृत्युमुखील पडलेल्या महिलेला छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाघोली ग्रामस्थांच्या वतीने अर्पण करण्यात आली. घरातून बाहेर पडल्यावर घरी सुखरूप येईल का नाही याची शास्वती आज नाही, प्रशासनाची भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत आहे, बेकायदेशीर वाहनांकडे दुर्लक्ष केले जाते, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा कडक शब्दात उपस्थित नागरिकांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top