• Home
  • सोशल
  • विमाननगर व खराडी रंगले गरबा दांडियाच्या रंगात
Image

विमाननगर व खराडी रंगले गरबा दांडियाच्या रंगात

सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचा गरबा दांडिया कार्यक्रम आनंदाचे व उत्साहाचे व्यासपीठ; नागरिकांचे मत

पुणे: “भारतीय सण संस्कृती व परंपरा ही कायमच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. समाजातील एकोपा, आपलेपणा वाढीस लागण्यासाठी सणांचे मोठे महत्त्व आहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन गरबा अँड दांडिया नाईट्स या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नागरिकांच्या उदंड प्रतिसादात कार्यक्रम पार पडला”, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.

सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या माध्यमातून २६ व २७ सप्टेंबर रोजी गरबा अँड दांडिया नाईट्स २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विमाननगर येथील सिम्बायोसिस मैदान व खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम या ठिकाणी दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला. दोन्ही ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

लकी ड्रॉ व पारंपरिक नृत्य तसेच वेशभूषा स्पर्धा व सुप्रसिद्ध डीजे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. विविध गटांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. डीजे अकेय, डीजे प्रसाद यांनी विमाननगर, तर डीजे शुभम व डीजे रूह यांनी खराडी येथे आपल्या संगीताच्या तालावर सर्वांना थिरकायला भाग पाडले.

नारीशक्तीचे पर्व म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. म्हणूनच, विमाननगर येथील कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना नारीशक्ती सन्मान देण्यात आला.

विमाननगर तसेच खराडी या दोन्ही ठिकाणी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपस्थिती दर्शवली. “सुरेंद्र पठारे फाऊंडेशन सातत्याने सामाजिक कार्यासोबतच सण उत्सवाची परंपरा जोपासण्याचे काम करत आहे. अशा कार्यक्रमात नागरिक एकत्र येतात, आनंद साजरा करतात, विचारांची देवाण घेवाण होते आणि आपुसकच सामाजिक बांधिलकीची वीण आणखीनच घट्ट होते”, अशा भावना आमदार पठारे यांनी यावेळी मांडल्या.

“दरवर्षी सुरेंद्र पठारे फाऊंडेशन नवरात्री उत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करत असते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम असल्याने आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सुरक्षित वातावरण असते ज्यामुळे पुरेपूर आनंद घेता येतो”, असे म्हणत सहभागी महिलांनी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे आभार मानले.

सुरेंद्र पठारे फाऊंडेशन अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांमधून कार्यरत आहे. सण-उत्सव यासोबतच समाजोपयोगी उपक्रम पुढेही राबवत राहणार असल्याचे प्रतिपादन फाऊंडेशनकडून करण्यात आले.

Releated Posts

उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद

उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद लोहगाव टाईम्स : प्रतिनिधीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनामुळे लोहगाव मधील मेडिकल वगळता…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 31, 2026

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी राजारामबापू महाविद्यालयामध्ये लोकनेते राजारामबापू…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 17, 2026

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अ‍ॅट अ टाइम” वाचन शिबिर

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अ‍ॅट अ टाइम” वाचन शिबिर लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 17, 2026

पुण्यात श्रील गुरुदेवांच्या जन्मशताब्दीचा जगभरातील सोहळा संपन्न

पुण्यात श्रील गुरुदेवांच्या जन्मशताब्दीचा जगभरातील सोहळा संपन्न लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी श्री चैतन्य गौडीय तीर्थ सेवाश्रम, श्री रामधन पार्क,…

ByBylohegaontimeseditor@gmail.com डिसेंबर 27, 2025
Scroll to Top