• Home
  • राजकीय
  • वाघोली-बकोरी रोडची पीएमआरडीए, पीएमसी अधिकाऱ्यांकडून पाहणीउपोषणाचा चौथा दिवस; मिश्रा यांची प्रकृती खालावली
Image

वाघोली-बकोरी रोडची पीएमआरडीए, पीएमसी अधिकाऱ्यांकडून पाहणीउपोषणाचा चौथा दिवस; मिश्रा यांची प्रकृती खालावली

वडगावशेरी : प्रतिनिधी
वाघोली-बकोरी रोडच्या समस्येबात १३ सप्टेंबर पासून आमरण उपोषण आंदोलन टीम वाकोच्या वतीने करण्यात येत असून उपोषणाच्या चौथ्या दिवशी १६ सप्टेंबर रोजी रोडच्या समस्येबाबत पीएमआरडीए व पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रोडवर येऊन पाहणी केली. याबाबत पीएमआरडीएने रस्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया केली आहे तर पीएमसीकडूनही याबाबत कार्यवाही करण्याबाबत पाऊले उचलण्यात येत आहेत. बकोरी रोड तसेच वाघोली परिसरातून रहिवाशांचा आंदोलनाला पाठींबा वाढताना दिसत आहे.
बकोरी रोडवर सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरून जाताना नागरिकांना अनेक वर्षांपासून कसरत करावी लागत असल्याने टीम वाको च्यावतीने आमरण उपोषण आंदोलन १३ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. उपोषणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रशासकीय स्तरावर हालचाली करण्यात येत आहे. पीएमआरडीए व पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येत रस्त्याची पाहणी केली. रस्त्याबाबत पीएमआरडीए सदरचा रस्ता पीएमसीने विकसित करावा व मोबदला देण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. त्याचबरोबर संबंधित बिल्डरला देखील रस्ता करण्याबाबत नोटीस बजावली आहे. रस्त्याबाबत पीएमसीने देखील डीपीआरबाबत पाऊले उचलली आहेत.
पीएमआरडीएने जिल्हाधिकारी तसेच वाघोली पोलीस स्टेशनला बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र द्यावे तसेच पीएमसीने ठराविक कालावधीतच रस्त्याचा डीपीआर व रुंदीकरण करण्याचे लेखी पत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अनिलकुमार मिश्रा यांनी आंदोलनस्थळी सांगितले.


उपमुख्यमंत्री शिंदे यांचा फोनवरून उपोषणकर्त्यांशी संवाद
टीम वाकोचे उपोषणकर्ते अनिलकुमार मिश्रा यांयांचे चौथ्या दिवशी आंदोलन सुरु असल्याने विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विचारपूस केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्रा यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून याबाबत मार्ग काढणार असल्याचे कळविले. पीएमसी, पीएमआरडीए अधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकर कार्यवाही करणार असल्याचे आश्वासित केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रशांत जगताप यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून लेखी उत्तर देण्याबाबत कळविले. विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला पाठींबा दर्शवित आहेत.

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top