• Home
  • क्राईम
  • खराडी पोलिसांनी अट्टल घर फोड्यास केली अटक५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
Image

खराडी पोलिसांनी अट्टल घर फोड्यास केली अटक५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

लोहगाव टाईम्स : (प्रतिनिधी)

खराडी पोलीसांनी अटटल घरफोड्यास अटक करून त्याच्याकडून ५ लाख ४० हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन घरफोडीचा गुन्हा व वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. बंडु ऊर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे, (वय ३५ वर्षे राहणार पठारे ठुबे नगर, खराडी) यास अटक केली आहे.

   खराडी पोलीस ठाणे हद्दीत  आपले घर सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका भाजी विक्रेत्या महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडुन ६ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिन्याची घरफोडी केली होती.  दाखल गुन्हयाच्या तपासात खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संजय चव्हाण, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे)  विश्वजित जगताप यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देउन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक  राहुल कोळपे व तपास पथकातील स्टाफ यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. नमुद गुन्हयाच्या तपास करत असताना  तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक  राहुल कोळपे व पोलीस हवालदार  महेश नाणेकर, शिपाई श्रीकांत कोद्रे,  विलास केदारी यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी बंडु ऊर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे यास खराडी परिसरातुन सापळा रचुन ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.  त्यास घर फोडीच्या गुन्हयात अटक करून आरोपी कडून तपास करुन त्याचेकडुन एकुण  ५ लाख ४० हजार ९७५ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, ७ विविध कंपनीचे मोबाईल फोन व ३ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.  त्याचेकडुन  खराडी पोलीस ठाण्याकडील घर फोडीचा व लोणीकंद पोलीस स्टेशन कडील वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस  आले आहेत. आरोपी वर  मालमत्ता चोरीचे विविध ठिकाणी ६ गुन्हे दाखल असुन  पुढील तपास पोलीस उप निरीक्षक  राहुल कोळपे हे करीत आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, वसीम सयद, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विलास केदारी, जयवंत श्रीरामे, यांनी केला आहे.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top