• Home
  • राजकीय
  • पालखी विसावा कळस येथे करा – रहिवाशांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन
Image

पालखी विसावा कळस येथे करा – रहिवाशांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी विसावा पूर्वी साडेतीनशे वर्षा पासून कळस याठिकाणी होता. मात्र यामध्ये राजकीय हस्तक्षेप करून मागील २३ वर्षा पासून पुढे फुले नगर येथे नेण्यात आला. आता पुन्हा कळस येथे पूर्ववत पालखी विसावा करावा अशी मागणी कळस येथील नागरिकांनी केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांची खासदार सेवा संपर्क अभियानात भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे म्हणाले, पालखी विसाव्याची कळस वासियांची मागणी अनेक दिवसापासूनची आहे. याबाबत आपण केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्याशी चर्चा केली असून ते पालखी विश्वस्तांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावणार आहेत.
कळस मधील नागरिक बंटी म्हस्के म्हणाले, पूर्वी कळस येथे विसावा होता. तो पूर्ववत करावा अशी मागणी कळस मधील सांप्रदायिक मंडळींसह सर्व नागरिकांची आहे.
धनजंय जाधव म्हणाले, वारकरी बांधवासह कळस, विश्रांतवाडी, धानोरी परिसरातील नागरिकांचा हा श्रद्धेचा विषय आहे. जर का आपल्या मागण्याचा विचार केला नाही तर आम्ही आंदोलन करून पूर्वी विसावा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी करू असे सांगितले.
यावेळी योगेश्वरी महिला भजनी मंडळ, कुरजांई माता महिला भजनी मंडळ, दत्त सेवा महिला भजनी मंडळ, तसेच कळस गावातील टाळकरी, माळकरी जनार्धन वाघमारे,एन्डे महाराज, नारायण मोरे दत्ता खलसे महादेव मोरे तुकाराम तरस शंकर सपकाळ तसेच नगरसेवक अनिल बॉबी टिंगरे बंटी म्हस्के, ऐश्वर्या जाधव, राजू केशरकर, राजेश लोकरे, अविनाश रिठे, विनोद मोरे, विशाल धापटे, विश्वास देवकर, प्रवीण बारमुख, माऊली भोसले, द्वारकेश जाधव आदी उपस्थित होते.

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top