शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून
येरवडा : प्रतिनिधी
येरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. माशक गजीबक्श विजपुरे (वय ४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खुनाचा प्रकार येरवड्यातील आर के चौकात आज (शनिवारी) सायंकाळी घडली.
आरोपी गणेश वसंत शिंदे ( 34, मूळ रा. कर्नाटक) यास अटक करण्यात आली आहे. याबाबतची
तक्रार मयताची बहीण मालन बी मेहबूब उत्साद (४७) यांनी पोलिसाकडे दिली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरके चौकात दारूच्या दुकानाजवळ मयत माशक याने आरोपी गणेश शिंदे यास आई बहिणीवरून शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या गणेश याने मित्राच्या मदतीने माशक यास बांबूच्या दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तो मृत झाला. याप्रकरणी मयताची बहीण मालन बी मेहबूब उत्साद यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.














