येरवड्यात खेळताना डोंगरावरून पडल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
जय जवान नगर येथे येरवडा
एक ११ वर्षाचा मुलगा येथील डोंगरावर जाऊन त्याच्या मित्राबरोबर खेळत असताना त्याचा तोल गेल्याने डोंगरावरुन खाली पडल्याने मृत्युमुखी पडला. श्रेयस शेखर भोसले (वय ११, रा. अशोक नगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर (येरवडा) पोलीस ठाण्यात एक अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
डोंगरावर सीमा भिंत बांधा
महापालिका प्रशासनाकडे वारंवार स्थानिक नागरिक तक्रार करत आहेत की या डोंगरावर सिमा भिंत बांधून देण्यात यावी.
आता पर्यंत मागील काही दिवसांपासून येथे चार दुर्दैवी घटना घडल्या आहेत. दरड कोसळण्याचे प्रकार झाल्याने त्या घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.
तरी पण प्रशासनाने या विषयावर कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. श्रेयस भोसले याचा दुर्देवी मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिक हळहळ व्यक्त करत असून डोंगराकडेला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..
कुठल्याही क्षणी डोंगराचा भाग पडेल आणि लोकांना इजा होण्याची दाट शक्यता आहे, तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक शरद करनावट, एजाज़ खान, यासीन शेख, विलास माने, सुलैम शेख यांनी केली आहे.
या घटनेची माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कदम म्हणाले, श्रेयस हा खेळताना तोल जाऊन उंचावरून खाली डोक्यावर पडला असल्याने तो गंभीर जखमी होऊन मृत झाला. याप्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
















