पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड
पुणे : प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांनी आपला फॉर्म दाखल केला आहे. निवडणूक बिनविरोध होणार असल्याने निवडणूक औपचारिकता राहिली आहे. सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळेल. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या असून यंदाही निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
अजित दादांनी दिलेला शब्द पाळणार.पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली.देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही असे राष्ट्रवादीच्या पदाधिका- यांनी माहिती दिली.
















