रामेश्वरम कॅफे मालकाच्या घरी दुध टाकणाऱ्याने केली चोरी; विमानतळ पोलिसांनी केली अटक
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
प्रसिध्द रामेश्वरम कॅफे मालकाच्या विमाननगर मधील घरी दुधवाल्याने घरफोडी केली होती. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून आरोपी व्यंकटेश वसंत करंडे, (वय ३४ वर्षे रा. जय विश्वकर्मा सोसायटी, वडगावशेरी) यास विमानतळ पोलिसांनी अटक केली.
याबाबत अॅमिनन्स बाय नाईकनवरे, न्यु एअरपोर्ट रोड, विमाननगर पुणे या उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहणारे सुर्यनारायण राजरतिलम यांचे राहते घरामधुन १,३२ हजार रुपये चोरीला गेले बाबत त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता. सदर बाबत तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफ यांनी सदर सोसायटी मधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सदर फुटेज मध्ये दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास दुध देण्यासाठी येणारा इसम सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत होता. सदर इसम नामे व्यंकटेश वसंत करंडे, (वय ३४ वर्षे रा. जय विश्वकर्मा सोसायटी, रुम नं. २ विदयानगर वडगावशेरी पुणे) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले. दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये नमुद आरोपी याने चोरी केलेली १ लाख ३२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु क-हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, अभयकुमार नागटिळक, शंकर वाघुले, सना शेख यांचे पथकाने केली आहे.














