आयटी- इंजिनिअर क्षेत्र ते नगरसेवक पद
प्रभाग क्र. ३, ४ मधून विजयी
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती वडगावशेरीतील प्रचाराची. प्रभाग क्र. ३ आणि ४ मधील लढतींकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या सर्वांवर मात करत सौ व श्री पठारे पती- पत्नी विजय झाले. पती सुरेंद्र पठारे इंजिनअर तर पत्नी ऐश्वर्या या आयटी कंपनीच्या मालक म्हणून परिचित आहेत. आता दोघांनीही वेगवेगळ्या प्रभागातून विजयी मिळविल्यामुळे नगरसेवक पदी 4विराजमान झाले आहेत.
शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे असताना त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे हे भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात होते. विशेष म्हणजे प्रचारावेळी याच कारणातून पठारे यांच्यावर मोठी टीका झाली होती, अजित पवार यांनीही आमदार पठारे यांना थेट टार्गेट केले होते. यासह स्थानिक आजी-माजी आमदारांनीही टिकेची झोड उठवली होती, अशा वातावरणातही पठारे कुटुंबातील सदस्यांनी निवडणूक लढवत विजयही मिळवला.
वडगाव शेरीचा विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. आमदार बापूसाहेब पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच निवडून आले होते. परंतु, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ऐश्वर्या पठारे प्रभाग क्र. ३ मधून तर सुरेंद्र पठारे प्रभाग क्र. ४ मधून रिंगणात उतरले होते. राजकीय टीका होत असताना निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते, त्यातून सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवीत ऐश्वर्या पठारे यांनी विजय मिळवत भाजपला यश मिळवून दिले. कोणावरही टीका न करता या दोघांनी मिळविलेला विजय चर्चेत राहिला. दोघांची जोडी विजयानंतर सोशल मिडिया मध्ये ट्रेडिंग मध्ये होती. सुरेंद्र पठारे यांच्या विजयानंतर तर शरद पवारांच्या आमदारांच्या घरातच कमळ फुलले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.















