राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
राजारामबापू महाविद्यालयामध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजारामबापू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.काशिनाथ मुंडे,प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील कार्यालयीन अध्यक्ष श्री. धीरज निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून राजारामबापू यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला व त्यांच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विचारमंच, भाषण, वकृत्व तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थितांनी राजारामबापू यांच्या कार्यास अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. महाविद्यालयात एक दिवसीय जनरेटिव्ह एआय बाय अरेना ॲनिमेशन यांच्यातर्फे कार्यशाळा घेण्यात आली , याप्रसंगी अरेना फाउंडेशनचे संस्थापक जसप्रीत सिंग आहूजा व त्यांचे सहकारी याप्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकिता ननावरे यांनी केले.



















