आजी-माजी आमदारानी राखला आपला गड
लोहगाव टाइम्स : प्रतिनिधी
वडगाव शेरी मतदारसंघातील विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे हे जरी राष्ट्रवादी (शरदचंद्रजी पवार) पक्षात असले तरी केवळ तांत्रिकदृष्ट्या ते त्या पक्षात आहेत. मात्र त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, सून ऐश्वर्या पठारे यांनी भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळवत विजयश्री खेचून आणला आहे. आमदार पठारे यांनी मुलगा आणि सुनेला निवडून आणण्यात मोठी जबाबदारी पार पाडली आहे. प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार या दोन्ही प्रभागात भाजपाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन विमाननगर – लोहगाव – वाघोली, प्रभाग क्रमांक चार खराडी- वाघोली या भागात आमदार बापूसाहेब पठारे यांचे वर्चस्व कायम राहिले.
माजी आमदार तसेच भाजपाचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये योगेश आप्पा मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिकार्याने निवडून आणले आहेत. त्यामुळे त्यांनी देखील आपला प्रभागावर वर्चस्व कायम ठेवले आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार तसेच विद्यमान शहराध्यक्ष सुनील अण्णा टिंगरे यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून सुहास टिंगरे तसेच हर्शल ऊर्फ रवी टिंगरे यांना उमेदवारी दिली होती. या प्रभागात देखील त्यांनी चारही घड्याळाचे उमेदवार निवडून आणल्यामुळे त्यांनी देखील आपल्या भागात आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपाचे अनिल उपबाबतींग्रे यांनी विजयाची हॅट्रिक करत विजयश्री खेचून आणला. त्याने आपल्या सोबत एसटी मधून संगीता दांगट तर एससी मधून अश्विनी भंडारे यांना विजय मिळवून दिला आहे.
एकंदरीतच वडगाव शेरी मतदारसंघात आजी-माजी आमदाराने आपापला गड शाबीत ठेवला आहे. पठारे, टिंगरे, गलांडे, मुळीक हे आपापले वर्चस्व ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. आगामी काळात कोणाचं वर्चस्व राहील याची चर्चा रंगली आहे.
१) आमदार बापूसाहेब पठारे , २) माजी आमदार सुनील टिंगरे , ३) माजी आमदार जगदीश मुळीक















