राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा: संतोष खांदवे
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक लोहगाव – धानोरी – कळस चा विकास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करू शकतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजयी करावे असे आवाहन संतोष खांदवे (रा. हरणतळे, लोहगाव) यांनी केले आहे.
लोहगाव टाईम्सशी बोलताना संतोष खांदवे म्हणाले, प्रभाग क्रमांक 1 कळस- धानोरी – लोहगाव मधील राष्ट्रवादीचे उमेदवार रेखाताई टिंगरे, शशिकांत टिंगरे, नूतन प्रताप, आरती चव्हाण हे चारही राष्ट्रवादीचे उमेदवार काम करणारे आहेत. मोठा प्रभाग असतानाही संपूर्ण प्रभागात त्यांनी घरोघरी जाऊन सर्व उमेदवारांनी एकत्रित प्रचार केला आहे. रेखाताई टिंगरे यांनी तीन टर्म मध्ये धानोरी परिसरात मोठी विकास कामे केली आहेत. आता नव्याने समावेश झालेल्या लोहगाव मध्ये त्यांच्या माध्यमातून विकास कामे केली जाणार आहेत. लोहगाव मध्ये रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज या मूलभूत सुविधा सर्व प्रथम पोहोचवून उद्यान, क्रीडांगणे, हॉस्पिटल अशा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणांर आहेत. लोहगाव च्या नव्याने झालेल्या डीपी (विकास आराखडा) वर काम करून शेतकऱ्यांना जास्तीजास्त मोबदला दिला जाईल. रस्त्यामध्ये जाणारी नागरिकांची घरे वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही सर्व कामे रेखाताई टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर तीनही करू शकतात. त्यामुळे त्यांनाच विजयी करावे असे आवाहन संतोष खांदवे यांनी केले आहे.
खांदवे म्हणाले, शशिकांत टिंगरे यांच्यासारखा नवीन नेतृत्व असलेला उमदा चेहरा प्रभाग एक ला मिळाला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून ते देखील या प्रभागाच्या विकासाकरिता प्रयत्न करतील असा विश्वास आहे. मागील चार वर्षांपासून त्यांनी जनतेत मिसळून काम केल्याने यावेळी त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नूतन प्रताप, आरती चव्हाण या दोन भगिनीचे देखील सामाजिक कार्य चांगले असून त्यांचे पती राहुल प्रताप, सायबु चव्हाण यांचे असलेले जनमाणसातील काम प्रेरणादायी आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना मतदार राजाचे आशीर्वाद चांगले मिळत असल्याने ते नक्की विजयी होतील असा विश्वास संतोष खांदवे यांनी व्यक्त केला.















