प्रभाग १ कळस–धानोरी–लोहगाव लक्ष्मी उर्फ मीनाताई माने इंगुळकर यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ (अ) अनुसूचित जाती SC महिला प्रवर्ग कळस–धानोरी–लोहगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी उर्फ मीनाताई माने इंगुळकर यांच्या प्रचारार्थ आज भव्य व दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात लोहगाव येथील जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिरापासून झाली. त्यानंतर खंडोबा माळ, पोरवाल रोड, निंबाळकर नगर, साठे वस्ती, खेसे पार्क, धानोरी, मुंजाबावस्ती, विश्रांतवाडी आणि कळस असा संपूर्ण मार्ग रॅलीने पार केला.
या रॅलीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) — शिवयुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मीनाताई माने इंगुळकर यांच्यावरचा विश्वास व्यक्त केला. रॅलीदरम्यान नागरिकांचा सहभाग आणि उत्साह लक्षणीय होता.
रॅलीतून जनतेने स्पष्ट संकेत दिले की यंदा प्रभाग क्रमांक १ (अ) मध्ये परिवर्तन अटळ आहे. अनुसूचित जाती (SC) गट ‘अ’ मधून स्थानिक उमेदवारालाच पाठिंबा देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला असून, या रॅलीमुळे मीनाताई माने इंगुळकर यांच्या विजयाबाबतचा विश्वास अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले.















