• Home
  • राजकीय
  • अनिल टिंगरे यांनी रविवार च्या दिवशी सोसायटी मधील नागरिकांशी साधला संवाद
Image

अनिल टिंगरे यांनी रविवार च्या दिवशी सोसायटी मधील नागरिकांशी साधला संवाद

अनिल टिंगरे यांनी रविवार च्या दिवशी सोसायटी मधील नागरिकांशी साधला संवाद

सोसायटी मधील मतदार भाजपाच्या पाठीशी

लोहगाव: टाईम्स प्रतिनिधी

प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवूनच लोकप्रतिनिधी माणून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. यापुढेही याच सचोटीने काम करत पोरवाल रस्ता, लोहगाव मधील सोसायट्यांसह डिफेन्स कॉलनी, खंडोबा माळ, प्रभागाच्या विकासासाठी एकमताने काम करण्याची ग्वाही प्रभाग क्रमांक १ (कळस धानोरी- लोहगाव- उअर्वरीत) ड गटाचे उमेदवार अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे यांच्यासह भाजप महायुतीच्या उमेदवारांनी दिली.
महायुती उमेदवार अनिल उर्फ बॉबी टिंगरे, वंदना खांदवे, संगीता दांगट, अश्विनी भंडारे आदी उपस्थित होते. रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने महायुतीच्या उमेदवारांनी सर्व सोसायट्या मध्ये जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सोसायटी मधील नागरिकांनी भाजपला मतदान करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, लोहगाव मधील डिफेन्स कॉलनीत बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. उमेदवारांचे स्वागत करताना आपल्या समस्या, अपेक्षा मांडल्या. उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत रस्ते, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, तसेच कार सुविधांबाबत नागरिकांनी मते मांडली. उमेदवारांनी सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत ठोस उपाययोजनांची माहिती दिली. प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये भाजपच्या पॅनल विषयी विश्वास वाढत आहे. डिफेन्स कॉलनी तील रहिवाशांना सर्व मूलभूत सुविधा महापालिकेच्या मार्फत उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन आणि टिंगरे यांनी दिले.

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top