एकमताने ‘कमळ’ निवडा; पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन
खराडी : प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांची पदयात्रा उत्साहात पार पडली. खराडी, पाटीलबुवा नगर, सातव वस्ती, पंढरीनगर, ठुबे नगर, चौधरी पार्क, अनुसया पार्क या भागांतून ही पदयात्रा काढण्यात आली. खराडी सारखा विकास आता वाघोलीचा करावयाचा असल्याने भाजपा चारही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन भाजपा उमेदवार सुरेंद्र पठारे यांनी केले.
उमेदवारांनी पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीच्या संकल्पना जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.
यावेळी येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत कमळ चिन्हा समोरील बटण दाबून भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ०४ मधून शैलजीत जयवंत बनसोडे, रत्नमाला संदीप सातव, तृप्ती संतोष भरणे, सुरेंद्र बापूसाहेब पठारे हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विजयातून प्रभागाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सुरेंद्र पठारे म्हणाले, वाघोली मधला “बालेकिल्ला” विकासकामांनी जिंकण्याची रणनीती बोलून दाखवली. यात त्यांनी सोसायटी मधील नागरिकांना पाणी, गटाराचे प्रश्न आणि वीज यांवर प्राधान्याने आणि कटाक्षाने लक्ष राहील असे नमूद केले. रत्नमाला संदीप (आबा) सातव यांनी महिला सुरक्षेसाठी एलईडी लाईट, सीसीटीव्ही वर लावणार असल्याचा पुनरुच्चार केला. शैलजीत बनसोडे यांनी ट्रॅफिक व वायू गुणवत्ता वर काम करणार असे सांगितले तर तृप्ती संतोष भरणे यांनी महिला सक्षमीकरणासाठी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणार असे आश्वासन दिले. भाजपच्या झंझावती कामापुढे विरोधक निष्भ्रम होत असल्याचे प्रभाग चार मध्ये सर्वत्र चित्र आहे.















