धानोरी गावच्या परंपरा अबाधित ठेवणार- शशीकांत टिंगरे
परांडे नगर, शेवंता पार्क, विघ्नहर्ता कॉलनी मध्ये प्रचाराचा झंजावत
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १ कळस- धानोरी – लोहगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसाधारण गटातील उमेदवार शशिकांत टिंगरे, रेखा टिंगरे, नूतन प्रताप, आरती चव्हाण यांनी मागील दोन दिवसांपासून परांडे नगर, शेवंता पार्क, विघ्नहर्ता कॉलनी मध्ये प्रचाराचा झंजावत दौरा करत मतदारांशी संपर्क केला. यावेळी धानोरी गाव, परांडे नगर हा परिसर विकासापासून दूर आहे, याठिकाणी विकास कामे करणार असून गावच्या सर्व परंपरा अबाधित राखण्याचं काम करणार असल्याचं आश्वासन शशिकांत टिंगरे यांनी दिले.

शशिकांत टिंगरे म्हणाले, परांडे नगर या ठिकाणी काही भागात डोंगरावरून पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी येऊन नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरते. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना त्रास होणार नाही असे आपण काम करणार असल्याचे शशिकांत टिंगरे यांनी सांगितले. आपण या भागातील नागरिकांच्या नेहमी सुख दुःखात सहभागी असल्याने यावेळी परिवर्तन नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवंता पार्क, विघ्नहर्ता कॉलनी मध्येही विकासाची गंगा पोहचिणार असून त्यासाठी मतदारांनी आपल्याला मतदान करून विजयी करावे असे आवाहन सर्व उमेदवारांनी केले. राष्ट्रवादीच्या पॅनल ला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ गुठ्यांची लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरत असल्याने महिला भगिनीचा राष्ट्रवादीच्या पॅनेल ला भक्कमपणे पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात आहे.















