जो पुण्याचा पालकमंत्री त्याची पालिका राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार: सुनील टिंगरे
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
‘ जो पुण्याचा पालक त्याच्या हाती पालिका ‘ हा अंजेडा घेऊन महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार असल्याचा विश्वास माजी आमदार शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला.
प्रभाग एक मधील राष्ट्रवादीच्या पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ धानोरीतील भैरवनाथ मंदिरातून करण्यात आला. यावेळी उमेदवार शशिकांत टिंगरे, रेखाताई टिंगरे, नूतन प्रताप, आरती चव्हाण, चंद्रकांत टिंगरे यासह धानोरी मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील टिंगरे म्हणाले, भाजप महापालिकेत सत्तेत असताना विकास कामे झाली नाहीत.स्पेशल फेल गेली आहे. पुण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवड्यातून एक वेळ पुण्यात असतात. ते विकास कामांवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे पुण्याचा विकास अजितदादा च्या माध्यमातून राष्ट्रवादीच करू शकते. यावेळी राष्ट्रवादीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजितदादांचे या प्रभागावर विशेष लक्ष असून विजयाची सुरुवात प्रभाग एक मधून होईल, आपले चारही उमेदवार निवडून येतील असा दावा देखील त्यांनी केला.
उमेदवार शशिकांत टिंगरे म्हणाले, मागील काळातील माननीय विकास कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. ते लोकांच्या संपर्कात नसतात. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. आपण नेहमी सुख दुःखात संपर्क ठेवला असून आपल्यासह आपल्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शशिकांत टिंगरे यांनी व्यक्त केला.
उमेदवार रेखाताई टिंगरे म्हणाल्या, धानोरीच्या विकासाचे रोल मॉडेल घेऊन लोहगाव चा विकास करणार आहे. लोहगावसाठी सर्व प्रथम पाणी, रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सुविधा देण्यावर आपला भर राहणार आहे. मी तर विजयाचा चौकार मारणार आहेच पण चारही उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे.
फोटो: धानोरी मधील काळभैरवनाथ मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करताना माजी आमदार सुनील टिंगरे, उमेदवार शशिकांत टिंगरे, रेखा टिंगरे, नूतन प्रताप, आरती चव्हाण.















