शेवटच्या क्षणी पूजा जाधव यांना भाजपची उमेदवारी; फुलेनगर नागपूर चाळमध्ये रंगतदार चौरंगी लढत
पुणे : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १ मधून पूजाताई जाधव यांची उमेदवारी कट झाल्यानंतर शेवटच्या क्षणी प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळमधून भाजपाकडून पूजाताई धनंजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
या अनपेक्षित निर्णयामुळे प्रभाग क्रमांक २ मध्ये आता भाजपाच्या उमेदवार पूजा जाधव यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी नगरसेविका शितल सावंत यांच्याशी होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.यापूर्वी आक्रमक भाषणशैलीमुळे चर्चेत आलेल्या पूजा धनंजय जाधव यांनी आपल्या प्रचारातून प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला होता. अनुभवी माजी नगरसेविका शितल सावंत यांचे विरोधात पूजाताई जाधव मैदानात उतरल्याने निवडणुकीची चुरस अधिक वाढली आहे. पूजा ताई जाधव यांचा आक्रमकपणा, थेट जनसंवाद आणि स्थानिक मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्याने मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
उच्चशिक्षित असलेल्या पूजा जाधव यांच्या प्रचाराची गती सध्या वेगाने वाढत असून उच्चशिक्षित असलेले चारही उमेदवार चर्चेचा विषय ठरत आहेत. फुलेनगर नागपूर चाळ परिसरात या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले असून मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, या प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडी यांच्यात चौरंगी लढत होणार असल्याने निवडणूक अधिकच अटीतटीची ठरण्याची चिन्हे आहेत. कोण बाजी मारणार, हे येत्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
तसेच या प्रभागातून माजी आमदार यांचे दोन बंधू एकाच पॅनल मधून निवडणूक लढवत असल्याने मतदारांमध्ये याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत.
प्रभाग क्रमांक २ भाजपा
१) राहुल जाधव
२) सुधीर वाघमोडे
३) पूजा धनजंय जाधव
४) रेणुका हुलगेश चलवादी
राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार
१) सुहास टिंगरे
२) शीतल सावंत
३) रवी टिंगरे
४) नलिनी धेंडे
महाविकास आघाडीचे उमेदवार:-
१) सुनील उर्फ पपू गोगले (उबाठा)
२) शिवानी माने (काँग्रेस)
३) अजहर खान यांची मिसेस (काँग्रेस)
४) प्रियांका रणपिसे (काँग्रेस)















