अशोकबापू खांदवे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर- लोहगाव- वाघोली मधील इच्छुक उमेदवार अशोक बापू खांदवे यांनी लोहगाव मधील काळभोर वस्ती, पवार वस्ती, शौर्या पार्क, चारवाडा वस्ती, ग्रीन पार्क, जे के पार्क, जनार्दन नगर, पठारे वस्ती या परिसरात प्रचार केला. यावेळी त्यांनी 2026 सालाची डायरी भेट देत मतदारांशी संपर्क केला. ख्रिसमस निमित्त ख्रिश्चन बांधवांना ड्राय फ्रुट, केक वाटून अशोकबापू खांदवे यांनी
शुभेच्छा दिल्या.
अशोक बापू खांदवे यांनी ग्राम पंचात सदस्य, हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती पद भूषविले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे ते पदसिद्ध सदस्य होते. ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार फंड या माध्यमातून अशोकबापू यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. कोरोना काळात सुमारे २५ हजार नागरिकांना लसीकरण स्वखर्चातून केले आहे. या राजकीय पदासोबत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे काम असून त्यांनी ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूलचे ते चेअरमन आहेत. विकास कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अशोक बापू प्रतिष्ठित, स्वच्छ, प्रामाणिक राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी त्यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल आहेत. मात्र त्यांची भाजपा मधून उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. प्रभाग तीन मध्ये वेगवेगळ्या १० टीम च्या माध्यमातून त्यांनी थेट मतदारांशी संपर्क सुरू ठेवला आहे.
लोहगाव मध्ये अशोकबापू खांदवे यांच्या प्रचार टीम सोबत सुभाष काळभोर, सुधीर काळभोर, अमोल पवार, प्रदीप खांदवे, संतोष खांदवे, गणेश खांदवे, बाळासाहेब खांदवे, गणेश खांदवे यासह मान्यवर उपस्थित होते. अशोकबापू यांच्या प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.















