राजेंद्र खांदवे यांच्या वतीने हजारो नागरिकांना मोफत देवदर्शन यात्रा
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
लोहगाव मधील सुसंस्कृत, सुशिक्षित असे व्यक्तिमत्व राजेंद्रदादा खांदवे यांच्या वतीने दोन टप्प्यात मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. राजेंद्र खांदवे यांनी आयोजित केलेल्या देवदर्शन यात्रेची लोहगाव मध्ये चांगली चर्चा झाली.
पहिल्या टप्प्यात अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी सुमारे 25 बस पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी, शिंगणापूर या ठिकाणी दहा बस यात्रेकरूंसाठी पाठवण्यात आल्या होत्या. दोन्ही यात्रेमध्ये प्रभाग क्रमांक तीन मधील हजारो नागरिक सहभागी झाले होते.
दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी यात्रेचा शुभारंभ आमदार बापूसाहेब पठारे, ज्येष्ठ व्यक्तिमत्व पांडुरंग आप्पा खेसे, वास्तुविशारद तज्ञ आनंद पिंपळकर रमेश खांदवे सुभाष काळभोर यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
राजेंद्र खांदवे यांच्या वतीने यात्रेकरून साठी चांगली सोय उपलब्ध करून देण्यात आली होती, अशी माहिती यात्रा करून आलेल्या भाविकांनी लोहगाव टाईम्सशी बोलताना दिली.















