अंतिम मतदार यादीत पुन्हा गोंधळ
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असून या मतदार यादी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचे आढळून येत आहेत. मतदार राहत असलेल्या प्रभागात मतदारांची नावे नसून दुसऱ्या प्रभागात समावेश करण्यात आल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक एक मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक दोन व तीन मध्ये समावेश करण्यात आली आहेत. तर प्रभाग क्रमांक एक मध्ये येरवडा, वाघोली या ठिकाणच्या मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. या अंतिम मतदार यादीवर भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी आक्षेप घेतला असून सर्व ठरवून करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. तातडीने ही मतदार यादी दुरुस्त करावी अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी केली आहे.















