प्रभाग एक मधील हिंदुत्वाचा प्रखर चेहरा – मीनाताई माने
खऱ्या एससी उमेदवाराला भाजप संधी देणार
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
गेल्या अठरा वर्षापासून भाजप पक्षाच्या एकनिष्ठ व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असणाऱ्या कळस-धानोरी- लोहगाव प्रभाग क्रमांक एक मधून मीनाताई माने (इंगुळकर) प्रभागातून हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. इतर धर्मात धर्मांतर करूनही एससी प्रवर्गाचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराना आरएसएस विरोध करत असल्याने मानेताई यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
धानोरी-कळस-लोहगाव प्रभाग क्रमांक एक मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून महिला राखीव गटातून पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या मीनाताई माने (इंगुळकर) यांचा सामाजिक क्षेत्राचा असलेला अनुभव दांडगा आहे. येरवडा हे त्यांचे माहेरघर आहे. मात्र बालवयापासूनच माहेरी कोणता ही वारसा नसताना देखील समाज कार्याची आवड त्यांना आहे. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाबाबत महिलांमध्ये जनजागृती करून साक्षरता मोहीम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे
बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न करून महिला मंडळ, भजनी मंडळ अशा अनेक माध्यमातून महिलांचे सबलीकरण त्यांच्या समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला.
भारतीय जनता पक्षाची असलेली विचार सरणी पटल्याने त्यांनी भाजप पक्षात २००७ साली प्रवेश करून आपले सुरू असलेले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले. धानोरी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मीनाताई माने (इंगुळकर) यांनी पक्षाच्या माध्यमातून प्राधान्य दिले आहे.
प्रभागात त्यांच्या कुटुंबियांकडून घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा तसेच सिनेअभिनेत्री श्रुती मराठे व वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार व पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदिशजी मुळीक यांच्या उपस्थितीत नवरात्र उत्सवात गरबा दांडिया स्पर्धेचे देखील या कुटुंबाकडून आयोजन केले होते. त्यांचा वाढदिवस टिंगरेनगर येथे असलेल्या रंगनाथन मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. गरीब विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरांचे देखील वाटप करण्यात येते. प्रभागातील महिलांना मोफत पंढरपूर, तुळजापूर दर्शन यात्रा देखील घडवून आणल्या. कोकणी बांधवांसाठी कोकण यात्रा घडवून आणल्या.
धानोरी-कळस-लोहगाव प्रभाग क्रमांक एकमधून यावेळी धर्मांतर करूनही एससी प्रवर्गाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे मानेताई या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.















