लाडक्या बहिणीसाठी एक गुंठा जमीन!
शशीअण्णा टिंगरे यांचा उपक्रम
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील लाडक्या बहिणीसाठी दरमहा १५०० रुपये मागील वर्षभरापासून जमा करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमुळे महायुती सत्तेवर येण्यासाठी फायदा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक एक चे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) उमेदवार शशिकांत टिंगरे यांनी
११ लाडक्या बहिणींसाठी प्रत्येकी १ गुंठा जागा मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या योजनेची पुणे शहरासह राज्यभरात चर्चा आहे.
पुणे महानगर पालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. सर्वच उमेदवारानी मतदारांशी आपला संपर्क चालू ठेवला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लढविल्या जात आहेत. पुणे शहरातील प्रभाग क्र.१ मधील महिलांसाठी श्री शशिआण्णा टिंगरे सोशल फाउंडेशन मार्फत अशीच एक भन्नाट योजना आणली असून त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
शशीअण्णा टिंगरे म्हणाले, प्रभागातील लाडक्या बहिणीसाठी तुमचा लाडका भाऊ म्हणून माझे कर्तव्य समजून मी एक आगळी वेगळी योजना राबवत आहे. माझ्या प्रभागातील ११ भाग्यवान बहिणींसाठी “लकी ड्रॉ” मार्फत ११ गुंठे जमीन मोफत पुणे जिल्ह्यात यवत च्या आजू बाजूच्या परिसरात दिली जाणार आहे. यासाठी कार्यालयात फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. तो फॉर्म पूर्ण भरून कार्यालयात जमा करावयाचा आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सहभागी होणाऱ्या महिलांचे प्रभाग क्रमांक एक मधील मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. लकी ड्रॉ काढून विजेत्या ११ महिलांना प्रत्येकी एक गुंठा जमीन दिली जाणार आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक एक मधील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शशीअण्णा टिंगरे सोशल फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क:-श्री. शशिआण्णा टिंगरे जनसंपर्क कार्यालय विठ्ठल मंदिर समोर धानोरी गाव पुणे 15















