माजी आमदार जगदीश मुळीक पुन्हा राजकारणात सक्रीय
कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
मागील दीड महिन्यापासून ऐन महापालिका निवडणुकीत आजारपणामुळे राजकारणापासून दूर असलेले वडगावशेरी मतदार संघाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. पक्ष प्रवेशावेळी देखील ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण जनसेवेला सुरवात करत असल्याचे सांगितले. जगदीश मुळीक यांचे कम बॅक झाल्याने मागील काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोष संचारला आहे.
मुळीक यांची वडगावशेरी मतदार संघावर भाजपा संघटनेच्या माध्यमातून चांगली पकड आहे. मात्र दीड महिन्या पूर्वी अचानक त्यांची बायपास सर्जरी करावी लागली. त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे मागील एक महिन्यापासून ते कुणाला भेटत नव्हते. केवळ फोनवरून कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. आज (शनिवारी) मुंबई येथे पक्ष प्रवेश झाले. प्रवेश झाल्यानंतर नारायण गलांडे यांनी त्यांची मुंबई येथे चेक अप साठी आलेल्या मुळीक यांची भेट घेतली होती. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून पुन्हा एकदा जनसेवेची सुरवात करणार असल्याचे सांगितले आहे.
मुळीक म्हणाले, माझे मार्गदर्शक आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. गेल्या दीड महिन्यांचा काळ माझ्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होता. नाईलाजानं मला या काळात समाजापासून दूर राहावं लागलं. मात्र या संपूर्ण काळात देवेंद्रजी मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्यावर आलेल्या वैद्यकीय संकटावर मात करून नव्या आत्मविश्वासाने पुन्हा जनसेवेसाठी सज्ज होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या अनुभव संपन्न नेतृत्वातून मिळालेली दिशा आणि विश्वास माझ्या पुढील वाटचालीस नवी ऊर्जा देणारी असल्याचे मुळीक यांनी म्हटले आहे. कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे देखील मुळीक यांनी सांगितले















