लोहगाव टाईम्स चे वृत्त खरे ठरले..!
रेखा टिंगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
प्रभाग एकच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
१ डिसेंबर रोजी लोहगाव टाईम्स ने रेखा टिंगरे हाती घड्याळ बांधणार असे मथळ्याखाली सर्व प्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर हे वृत्त खरे ठरले. रेखा टिंगरे या २००७ रोजी सर्व प्रथम काँग्रेस पक्षावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१२ व २०१७ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून नगरसेविका झाल्या होत्या. २०२२ साली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. २०२४ साली गत विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. १५ जानेवारी मध्ये होणाऱ्या पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. लोहगाव टाईम्स ने याबाबत १ डिसेंबर टिंगरे या राष्ट्रवादी चे घड्याळ हाती बांधणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले.
रेखा टिंगरे म्हणाल्या, कळस- धानोरी मध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे आपण मार्गी लावली आहेत. अशाच प्रकारे विकास कामांचा धडाका आता लोहगाव मध्ये आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत.















