• Home
  • राजकीय
  • येरवडा मनोरुग्णायातील विकास कामांसाठी १४ कोटी ५० लक्ष आणि महिला खुले व मध्यवर्ती कारागृहातील कामांसाठी रु. १ कोटी ५ लक्ष निधी मंजूर.
Image

येरवडा मनोरुग्णायातील विकास कामांसाठी १४ कोटी ५० लक्ष आणि महिला खुले व मध्यवर्ती कारागृहातील कामांसाठी रु. १ कोटी ५ लक्ष निधी मंजूर.

येरवडा मनोरुग्णायातील विकास कामांसाठी १४ कोटी ५० लक्ष आणि महिला खुले व मध्यवर्ती कारागृहातील कामांसाठी रु. १ कोटी ५ लक्ष निधी मंजूर.

आमदार पठारे यांची माहिती

पुणे: प्रतिनिधी

वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा परिसरातील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि येरवडा महिला खुले व मध्यवर्ती कारागृहाच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सातत्याने केलेली मागणी व पाठपुराव्याला यश आले असून हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यात अखेर मंजुरी मिळाली आहे. यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथील अत्यावश्यक बांधकाम व पुनर्बांधणीच्या कामासाठी १४ कोटी ५० लक्ष तसेच येरवडा महिला खुले व मध्यवर्ती खुले कारागृहातील कामांसाठी १ कोटी ५ लक्ष रुपयाच्या विविध कामांचा समावेश आहे.

मंजूर कामांमध्ये येरवडा महिला खुले कारागृह येथे १०० महिला बंदींकरिता नवीन बॅरेक बांधकामासाठी अंदाजे ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच येरवडा खुले कारागृह येथे २०० बंदींकरिता ४ नवीन बॅरेक बांधकामासाठी सुमारे ३० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय, येरवडा खुले कारागृहात ८ नवीन बॅरेक, स्वच्छतागृहे व स्नान ओटे बांधण्यासाठी (जी+च्या ४ इमारती) सुमारे ४५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यासोबतच, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, येरवडा येथील वॉर्डच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल १४ कोटी ५० लक्ष रुपयांचा मोठा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारून रुग्णांसाठी अधिक सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज वातावरण उपलब्ध होणार आहे.

या सर्व कामांसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असून, महिला बंदी, कैदी तसेच मानसिक रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत व इतर आवश्यक सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होतील. वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा महिला खुले व मध्यवर्ती कारागृहातील कैदी व सर्व घटकांसाठी हा निर्णय दिलासादायक व महत्त्वाचा ठरणार आहे.

आमदार बापूसाहेब पठारे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि निधीची ठाम मागणी यामुळेच ही कामे मंजूर झाली असून, येत्या काळात या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top