ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा उपक्रम; प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी धानोरीकरांचे केले अभिनंदन
माता जिजाऊ प्रतिष्ठान, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, युवा नेते विशाल टिंगरे आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून धानोरी येथे ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. मॅरेथॉन स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धानोरीकरांचे अभिनंदन केले.
मोहोळ म्हणाले, 2047 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत, सुदृढ आणि बलशाली भारत बनविण्याचे स्वप्न आहे. आजचा धानोरीतील मॅरेथॉन स्पर्धेचा त्याचाच एक भाग आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्य असे अनेक संदेश देणारा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून फिट इंडिया, खेलो इंडिया असे वेगवेगळे उपक्रम देशभरात राबवून खेळाला चालना आणि प्रोत्साहन देण्याचं काम मोदींच्या माध्यमातून केलं जात आहे. आजचा अनिल टिंगरे यांनी आयोजित केलेली ग्रीन मॅरेथॉन ही स्पर्धा त्यातीलच एक भाग असल्याचे प्रतिपादन मोहोळ यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे दहा हजार नागरिक सहभागी झाल्याचे पाहून त्यांनी धानोरीकरांचे अभिनंदन तर केलेच तर पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सहभागातून दिसून आल्याचे देखील मोहोळ यांनी व्यक्त केले.


यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, माजी नगरसेवक राहुल भंडारे, माजी नगरसेविका ऐश्वर्या आशुतोष जाधव, संतोषलाला खांदवे नितीन भुजबळ, धनंजय जाधव, संदीप मोझे, वंदनाताई खांदवे, पूजाताई जाधव, सुनीताताई मोझे, लिंगू साखरे, विशाल टिंगरे, शैलेश रणवरे, सुभाष पाटील, जगदीश देशपांडे, संदीप दांगट, संगीता दांगट यासह माता जिजाऊ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, वनविभागाचे अधिकारी, विविध संस्था, मंडळे, प्रतिष्ठानचे कार्यकर्त, प्रभाग एक मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















